जागतिक पालकदिनी पालघरमधील नवली गावी बालवाडीचे उद्घाटन

वसई दि.२ जून.बालवाडी हे शिक्षणाचे खरे मुळ असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बालवाडी ते दुसरी पर्यंतचे शिक्षण हा बाल शिक्षणाचा महत्त्वाचा भाग गणला जातो."मुले ज्या ठिकाणी आनंदाने शिकतील अशा आनंदवाड्या निर्माण झाल्यास ख-या अर्थाने  उच्च शिक्षणाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल" असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ‌श्री.प्रमोद पाटील यांनी केले.

विशेष प्रतिनिधी
वसई दि.२ जून.बालवाडी हे शिक्षणाचे खरे मुळ असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बालवाडी ते दुसरी पर्यंतचे शिक्षण हा बाल शिक्षणाचा महत्त्वाचा भाग गणला जातो."मुले ज्या ठिकाणी आनंदाने शिकतील अशा आनंदवाड्या निर्माण झाल्यास ख-या अर्थाने  उच्च शिक्षणाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल" असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ‌श्री.प्रमोद पाटील यांनी केले. मा.प्रमोद पाटील यांच्या शुभ  हस्ते नवली नवलनगर  येथे "ज्ञानार्जन फाऊंडेशन"संचलित बालवाडीचे उद्घाटन पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तेव्हा श्र.पाटीलहर म्हणाले की, "अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करुन समाजातील सामान्य कुटुंबातील बालकांना  योग्य व यथोचितपणे शिक्षण देणे आज काळाची गरज आहे". ज्ञानार्जन फाऊंडेशन ने सुरु केलेल्या बालवाडीचे मोठ्या  नामवंत शाळेत रुपांतर  होवो अशी सदिच्छा व्यक्त केली.  यावेळी ज्ञानार्जन फाऊंडेशनचे विश्वस्त श्री.जगन्नाथ घरतसर यांनी सांगितले की, ही संस्था  ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत असते.दरवर्षी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून अभ्यासाची प्रेरणा देत असते. तसेच इ.१०वी व इ.१२वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशक करुन शैक्षणिक प्रगतीसाठी झटत असते.तसेच  विनामूल्य आरोग्य शिबीर आयोजित करून आजारी नागरिकांची रोग निदान करून औषधोपचार करणे. या वर्षी नवली नवलनगर येथे "प्ले  ग्रुप, नर्सरी,ज्यु.केजी व सि.केजी शाळा नवली नवलनगर येथे सुरू करणे गरजेचे आहे म्हणून ज्ञानार्जन फाऊंडेशनने सुरु केलेली आहे. या प्रसंगी विश्वस्त जगन्नाथ घरतसर , श्रीम.चेतना चुरी,जागृती पाटील व संध्या प्रधान हजर होते.